नवी दिल्ली । लोकसभेच्या मुख्य सभागृहात दोन घुसखोरांनी धुराच्या नळकांडया फोडल्यामुळे नव्या संसदभवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून संसदेच्या सुरक्षावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. यातच या घटनेवरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचे ते म्हणाले. या घटनेमागील कारणही त्यांनी सांगितले. या देशात बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही. या घटनेमागे बेरोजगारी आणि महागाई हे कारण असल्याचे राहुल गांधी म्हणाले
Discussion about this post