नवी दिल्ली । सध्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज लोकसभेत संसदेच्या सुरक्षेतील कुचराईवरून विरोधकांनी गदारोळ केला. याच दरम्यान, सभागृहातील कामकाजात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत लोकसभेतील विरोधकांच्या १५ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. चालू संसदेच्या अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी त्यांना निलंबित केले.
यापूर्वी काँग्रेसच्या पहिल्या पाच खासदारांना संसदेच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते. यानंतर आज कनिमोझी, करुणानिधी यांच्यासह आणखी नऊ खासदारांना निलंबित करण्यात आले.
दोन दिवसापूर्वी लोकसभेत खासदार बसलेल्या बाकांवर या तरुणांनी उड्या मारून धुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षितेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत विरोधकांनी सभागृहात विरोधकांनी मोठा गोंधळही केल्याचे पाहायला मिळाले होते.
काल झालेल्या या घटनेवर गंभीर दखल घेत विरोधकांच्या १५ खासदारांचे निलंबन केले आहे. सभापतींनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांची नावं दिल्यानतंर 15 विरोधी खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.