अमळनेर । अमळनेरच्या स्टेट बँकेत मुलांना पैसे पाठवण्यासाठी आलेल्या सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अर्जुन आत्माराम बोरसे (67, पांडुरंग रेसीडेन्सी, अमळनेर) यांच्याकडील एक लाख रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
अर्जुन बोरसे हे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी असून त्यांना नुकतीच सेवानिवृत्तीची रक्कम मिळाल्याने त्यातून त्यांनी पत्नीसाठी दागिणे घेतले. मुलगा आणि मुलगी यांना पैसे पाठवायचे असल्याने त्यांनी दागिने मोडले. एक लाख 45 हजारांची रक्कम घेवून सोमवारी सकाळी 11.30 वाता ते अमळनेरच्या स्टेट बँकेत आले.
यावेळी सुरूवातीला त्यांनी मुलीच्या खात्यावर 45 हजार रुपये पाठवले मात्र याचवेळी पाळत ठेवून असलेल्या भामट्यांनी बोरसे यांच्याकडील पिशवीला ब्लेड मारले व त्यातून एक लाख रुपये लांबवले. काही वेळेनंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
Discussion about this post