मुंबई । महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांनी मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिला आहे. आनंद निरगुडे यांनी मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने मागासवर्ग आयोग बरखास्त होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आनंद निरगुडे यांनी शासकीय हस्तक्षेपामुळे त्रस्त होऊन राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे. निरगुडे यांचा राजीनामा मुख्य सचिव यांनी स्वीकृत केला आहे. त्या अनुषंगाने OBC मंत्रालयातील अवर सचिव नरेंद्र आहेर यांनी पत्रकान्वये राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयास कळवले आहे.
याआधी बबनराव तायवाडे, संजय सोनावणे, लक्ष्मण हाके, बी एल किल्लारीकर यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. एकीकडे ही डेडलाईन तोंडावर आली आहे. तर दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगात मात्र सदस्यांचे राजीनामा सत्र सुरू आहे.
राज्य सरकार आणि आयोगाचे सदस्य यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयात आयोगाच मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करणार आहे त्यामुळे हा वाद राज्यासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे.
Discussion about this post