मुंबई : हिंदी सिने जगतातून एक दुःखद बातमी समोर आली असून बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार ज्युनिअर मेहमूद यांचे निधन झाले आहे.वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ज्युनिअर मेहमूद यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
ज्युनियर महमूद गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाच्या चौथ्या स्टेजवर होते आणि या गंभीर आजाराशी ते झुंज देत होते. अखेर त्यांची या आजाराशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे.
त्यांचं गुरूवारी मध्यरात्री निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. इतकंच नाहीतर त्यांना रुग्णालयातून घरी आणल्यानंतर घरीही त्यांच्यावर उपचार सुरू होते.
Discussion about this post