जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत समारंभात ज्या विद्यार्थ्यांना पदवी/पदवीका प्रमाणपत्र घ्यावयाचे आहेत त्यांनी विलंबाशुल्कासह दि. २० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते आता विलंबशुल्कासह दि. २० डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यापीठातर्फे डिसेंबर, २०२२ आणि एप्रिल/मे/जून-२०२३ व त्यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पीएच.डी. धारकांकरिता पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन पदवी / पदविका प्रमाणपत्रासाठी विलंबशुल्कासह दि. २० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि काही विद्यार्थी, प्राचार्य / संचालकांनी विद्यार्थी हिताच्या दृष्टीने मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे.
त्या अनुषंगाने व प्राप्त आदेशानुसार पदवी/पदवीका प्रमाणपत्रासाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २० डिसेंबर, २०२३ पर्यंत वाढविण्यात येत आहे. विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर Home Page वरील Student Corner-> Examination-> Convocation वर उपलब्ध आहे. विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ०८ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०२३ पर्यंत आहे.
उत्तीर्ण वर्षापासून पाचवर्षाच्या आत पदवीप्रमाणपत्र शुल्क रूपये ५००/- असून उत्तीर्ण वर्षापासून पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास रूपये १३००/- भरावे लागतील तसेच विलंब शुल्क रूपये १००/- असेल. पदवीप्रमाणपत्राचे शुल्क क्रेडिट कार्ड/डेबीट कार्ड/ नेट बँकिग द्वारे ऑनलाईन भरावे. अर्ज भरतांना सूचनांचे तंतोतंत पालन करावे अर्जात अपूर्णता अथवा त्रुटी आढळून आल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल व कोणतेही शुल्क परत करण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांनी केले आहे.
Discussion about this post