नवी दिल्ली । राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात आले आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे.
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी चौकशी समितीही नेमली होती. या समितीने अहवाल दिला होता. त्यात त्या दोषी आढळल्या. या प्रकरणावर आज संसदेत चर्चा झाली आणि मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली.
संसदेत गेल्यानंतर महुआ या थोड्यावेळाने परत संसदेतून बाहेर पडल्या. यावेळी त्या प्रचंड रागात होत्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. आज माझी खासदारकी रद्द करण्यात आली आहे. उद्या माझ्या घरी सीबीआय येईल. पण अदानीचं काहीच होणार नाही. मी अदानीचा मुद्दा उचलला होता. अदानींच्या 30 हजार कोटीच्या घोटाळ्यावर मौन का साधलं गेलंय? माझ्या चौकशीत एक छदामही सापडला नाही. कमिटीने कांगारु कोर्टासारखं काम केलं आहे, अशी टीका महुआ यांनी केली.
Discussion about this post