कटक । ओडिशातील कटक रेल्वे स्थानकावर भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्सप्रेस ट्रेनला आग लागल्याचे वृत्त आहे. आज गुरुवारी सकाळी स्टेशनवर ट्रेनला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या दुर्घटनेने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. ही आग किरकोळ होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, जनशताब्दी एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी भुवनेश्वर स्थानकातून रवाना झाली. ती कटक रेल्वे स्थानकात पोहोचली. तिथेच एक्स्प्रेसचे ब्रेक जाम झाले. एका डब्याच्या खालील बाजूस आग लागली. एक्स्प्रेसच्या डब्याला लागलेली आग तात्काळ आटोक्यात आणण्यात आली, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. एक्स्प्रेसच्या डब्याच्या खालील बाजूस आग लागली होती. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर येत होते.
या घटनेनंतर खबरदारी म्हणून प्रवाशांना तात्काळ डब्यातून खाली उतरवण्यात आले. या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेनंतर बराच वेळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते..
Discussion about this post