चेन्नईत । बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या मिचॉन्ग या चक्रीवादळाने तमिळनाडूमध्ये हाहाकार माजविला असून मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले असून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो कार आणि दुचाकी या वादळाचा बळी ठरल्या आहेत. पावसाचा कहर अजूनही सुरूच आहे. हजारो घरांमध्ये पाणी शिरले असून चेन्नईतील रस्ते पाण्याने जलमय झाले आहेत.
मिचौंग चक्रीवादळ आता वेगाने तामिळनाडू आणि आंध्र पदेशकडे सरकत आहे. वादळ येणार असल्याने पूर्व किनारपट्टीवरील ८ जिल्हांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वादळ नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान अलेल्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर त्याचा वेग आणखी वाढेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
चेन्नईत (Chennai) सातत्याने मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे एकूण १२ उड्डाणे रद्द करण्यात आलीत. रस्ते वाहतूक देखील बंद करण्यात आली असून अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी नागरिकांना स्वत:ची काळजी घ्या तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असे आदेश दिलेत. तसेच आंध्र प्रदेशातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने तिरुपती, बापटला, कृष्णा, पश्चिम गोद, नेल्लोर, प्रकाशम या जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केलाय.















Discussion about this post