जळगाव-: केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2023-24 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता 13 जागा व आर्थिकदृष्या दुर्बल घटकांकरीता 1 जागा तसेच वेंकटगिरी करीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/सोलापूर/मुंबई/औरंगाबाद यांचेमार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज 20 जून, 2023 पर्यंत मागविण्यात येत आहेत.
इच्छुक उमेदवारांनी याबाबत आपले परिपूर्ण अर्ज 20 जून, 2023 पर्यंत संबंधीत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमूना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमूना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असे एम. जे. प्रदिप चंदन, आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Discussion about this post