जळगाव । आमदार खडसेंना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यावरून मंत्री महाजनांनी त्यांच्यावर टीका केली होती. 137 कोटींची नोटीस आल्याने हे नाटके चालवण्यात आल्याचा आरोप मंत्री महाजन यांनी केला होता. आता त्यांच्या या टीकेला एकनाथ खडसे यांनी प्रत्त्युत्तर दिल आहे.
आमदार खडसे म्हणाले की, माझ्या आजारपणाचे सगळे कागदपत्रे तपासा, जर माझे आजारपण खोटे असेल तर मला भर चौकात जोड्याने मारा आणि खरे असेल तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो, असे आव्हानच आमदार खडसेंनी गिरीश महाजनांना दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. व्हिडिओ ट्विट करीत मंत्री गिरीश महाजनांना हे आव्हान आमदार खडसेंनी दिले आहे.
तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना गिरीश महाजन यांनी प्रसुतीशास्त्र विभागात जास्त लक्ष दिले त्यामुळे त्यांची त्या खात्यातून हकालपट्टी झाली, अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी प्रतिहल्ला केला. त्यांची साठी बुद्धी नाठी झालेली आहे त्यामुळे त्यांना काही सुचत नाही. त्यांना खात्री करायची असेल तर माझी सर्व कागदपत्रे तपासावीत. त्यात कार्डियाक अॅरेस्ट हा काय प्रकार असतो तो पाहून घ्यावा. आजार खरा की खोटा हे तपासावे. महाजनांना खडसे नावाची कावीळ झाली आहे.
Discussion about this post