जळगाव । जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झालेली आहे. दिवसेंदिवस या घटना वाढत असताना चोरट्याने खाकीचा धाकच उरलेला नसल्याचे दिसून आलं. अशातच जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर औरंगाबाद, नाशिक, पुणे या जिल्ह्यांमध्ये भरदिवसा घर फोड्या करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.
त्यांच्याकडून तीन लाखांची रोकड, सोन्या चांदीचे दागिणे व एक गावठी कट्टा, चारचाकी वाहनाच्या एकूण २४ वेगवेगळया क्रमाकांच्या नंबरप्लेट असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.याप्रकरणी सात जणांच्या टोळीपैकी पथकाने चार जणांना अटक केली. सागर लक्ष्मण देवरे मोहाडी ता.जामनेर, आकाश सुभाष निकम, अमोल सुरेश चव्हाण व महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
जळगाव जिल्ह्.यात पाचोरा तसेच जामनेर तालुक्यातील काही संशयित तरुण हे चारचाकीच्या नंबरप्लेट बदलावून वेगवेगळ्या चारचाकी वापरत जळगाव जिल्ह्यासह वेगवेगळ्या जिल्हयांमध्ये भरदिवसा घरफोड्या करुन रोकड तसेच दागिणे लांबवित असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी संशायितांचा शोध घेवून कारवाईच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चार जणांना पथकाने अटक केली आहे.
तर जितेंद्र गोकूळ पाटील, अमोल गोकूळ पाटील व पवन ऊर्फ पप्पू सुभाष पाटील सर्व रा. मोहाडी ता जामनेर हे फरार झाले आहेत. दरम्यान अटकेतील संशयितांनी जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात तब्बल ३१ घरफोड्या केल्याची कबूली दिली आहे. दरम्यान फरार संशयितांचा शोध सुरु असून त्यांना अटक झाल्यास बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Discussion about this post