पुणे । पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कोलाड पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झाला. यात मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात 6 ते 8 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून ज्यात काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या अपघाताची दृश्य कैद झाली आहेत.
यामध्ये अनियंत्रित टेम्पोने अनेक वाहनांना धडक दिलेली दिसत आहे. आधी रस्ता ओलांडणाऱ्या एका कारला चिरडल्यानंतर रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराला या टेम्पोने धडक दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच रस्त्यावर असलेल्या कारला देखील या टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार उडून बाजूला पडल्याने थोडक्यात बचावला मात्र दुचाकी आणि इतर कारचे नुकसान झाले.
भरधाव टेम्पोने अनेक वाहनांना उडवले#Pune pic.twitter.com/8LpyliBmcO
— jitendra (@jitendrazavar) November 21, 2023
दरम्यान, याबाबत टेम्पो चालक गोविंद भालचंद्र लाल याच्यावर पौंड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Discussion about this post