आज (१९, नोव्हेंबर) आयसीसी वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामना होणार असून आज वर्ल्डकप जिकणाऱ्या विजेत्यासह उपविजेत्या संघासाठी आयसीसीकडून मोठ्या बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच पराभूत संघही मालामाल होईल. ICC ने संपूर्ण विश्वचषकासाठी किती बक्षीस ठेवले आहे? जाणून घ्या सविस्तर.
एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या संघाला आयसीसीकडून (ICC) तब्बल ४० लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास ३३.१७ कोटी रुपये मिळतील. तसेच उपविजेत्या संघाला २० लाख डॉलर म्हणजेच १६.५८ कोटी दिले जातील. उपांत्य फेरीत खेळणाऱ्या संघाला प्रत्येकी ८० हजार अमेरिकन डॉलर (अंदाजे ६.६३ कोटी) मिळणार आहेत.
या स्पर्धेत उपांत्य फेरीतच आव्हान संपुष्टात आलेल्या संघांनाही मोठी रक्कम मिळणार आहे. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना आठ लाख डॉलर्स (सुमारे 6.63 कोटी रुपये) मिळतील. त्याचबरोबर ग्रुप स्टेजमधून बाहेर पडलेल्या 6 संघांना प्रत्येकी 1 लाख म्हणजे अंदाजे 82 लाख रुपये मिळतील.
२०११ च्या विश्वचषकापेक्षा अधिक रक्कम…
2011 मध्ये, जेव्हा भारताने मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून दुसरा विश्वचषक जिंकला होता. त्यावेळीही आयसीसीने बक्षिसांचा वर्षाव केला होता. महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखालील भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी 25 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. जे यावेळच्या बक्षीस रकमेपेक्षा 8 कोटी रुपये कमी आहे.