सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि बँकेत लिपिक पदावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ही महत्वाची अपडेट आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 8773 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी उमेदवाराने SBI ची अधिकृत साइट sbi.co.in ला भेट द्यावी लागेल. तसेच या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे.
भरले जाणारे पद – लिपिक (कनिष्ठ सहकारी)
पद संख्या – 8773 पदे
पात्रता : कोणत्याही शाखेतून पदवीधर असायला हवे.
वयोमर्यादा
1. SC / ST – ३३ वर्षे
2. ओबीसी – ३१ वर्षे
3. अपंग व्यक्ती (सामान्य) – ३८ वर्षे
4. अपंग व्यक्ती (SC/ST) – ४३ वर्षे
5. अपंग व्यक्ती (OBC) – ४१ वर्षे
अर्ज फी
या भरतीसाठी उमेदवाराला खुल्या प्रवर्गासाठी ७५० रुपये तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यात सूट देण्यात आली आहे.
अर्जाची शेवटची तारीख
अर्ज करण्याची तारीख – १७ नोव्हेंबर, २०२३
अर्ज करण्याची अंतिम तारीख – ७ डिसेंबर, २०२३
निवड कशी होईल?
या पदांसाठी उमेदवारांची निवड विविध टप्प्यांत होणाऱ्या परीक्षेच्या आधारे केली जाईल. या अंतर्गत, जानेवारी 2024 मध्ये प्रिलिम परीक्षा आयोजित केली जाऊ शकते. तर मुख्य परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होऊ शकते. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY