मुंबई : सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंत भारताने सगळे सामने जिकंले असून उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. मात्र यातच टीम इंडियाच्या तमाम चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.
ती म्हणजे वर्ल्ड कपमध्ये गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याचा दुखापत झाली होती. दुखापतीमुळे हार्दिक आता वर्ल्ड कपमध्ये पुढील सामने खेळू शकणार नाहीय. हार्दिक वर्ल्ड कपमधून बाहेर गेल्यामुळेचाहते निराश झाले आहे. हार्दिक पांड्याच टीममध्ये नसणं हा संघासाठी एक झटका आहे.
“मी वर्ल्ड कपच्या उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही, हे वास्तव पचवणं खूप कठीण आहे. मी मनाने टीमसोबतच राहणार असल्याचं हार्दिकने म्हटलं आहे. तुमच्या सदिच्छा, प्रेम आणि समर्थनासाठी मनापासून आभार. हे अविश्वसनीय आहे. ही टीम विशेष आहे. प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी कामगिरी आपण करु हा मला विश्वास आहे” असं हार्दिक पांड्याने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलय.
बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात खेळताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो न्यूझीलंड, श्रीलंका आणि इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. हार्दिक पांड्या 2-3 सामन्यात खेळणार नाही, असं वाटलं होतं. पण त्याची दुखापत गंभीर होती. त्याच्याजागी सूर्यकुमार यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. सूर्यकुमार इंग्लंड विरुद्ध 49 धावांची इनिंग खेळला. श्रीलंकेविरुद्ध तो चालला नाही. हार्दिकच बाहेर होण टीम इंडियासाठी झटका आहे. कारण टीमला हार्दिकच्या जागी दोन खेळाडूंचा समावेश करावा लागतो. हार्दिक पांड्या सहाव्या नंबरवर फलंदाजीसाठी यायचा. कॅप्टनला त्याच्यामुळे सहाव्या गोलंदाजाचा पर्याय मिळायचा.