धुळे | धुळे महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरती मार्फत एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता – अटल बिहारी वाजपेयी सभागृह मनपा आवार नवीन इमारत, धुळे.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)
फार्मासिस्ट
पात्रता –
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – एम.बी.बी.एस., व मेडिकल कॉन्सिलकडील रजिस्ट्रेशन
फार्मासिस्ट – बी.फार्मा / डी. फॉर्मा व मेडिकल कॉन्सिलकडील रजिस्ट्रेशन
वेतनमान (Pay Scale) : 17,000/- रुपये ते 60,000/- रुपये.
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Discussion about this post