सुरत । सध्या आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच गुजरातच्या सूरतमध्ये एकाच कुटुंबातल्या सात जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून यात तीन लहान मुलांचाही समावेश आहे ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे.
आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळतेय. या सात जणांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. कनुभाई सोलंकी आणि त्यांच्या कुटुंबानं राहत्या घरातच आत्महत्या केली आहे. कनुभाई यांचा मुलगा मनिषचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. तर कनुभाई, त्यांची पत्नी शोभनाबेन, मनिषची पत्नी रीटा, मनिषच्या 10 आणि 13 वर्षांच्या मुली दिशा आणि काव्या तर मुलगा कुशल यांचे मृतदेह अंथरुणावर पडलेल्या अवस्थेत मिळाले.
धक्कादायक घटनेसंदर्भात माहिती देताना झोन 5 चे डीसीपी राकेश बारोट म्हणाले की, ही घटना अडाजन परिसरातील सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये घडली. अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर कनुभाई सोळंकी हे कुटुंबासह राहत होते. कनुभाई यांचा मुलगा मनीष उर्फ शांतू सोळंकीचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता, तर कनुभाई, त्यांची पत्नी शोभनाबेन, मनीषची पत्नी रिटा, मनीषच्या 10 आणि 13 वर्षांच्या मुली दिशा आणि काव्या तसेच, लहान मुलगा कुशल यांचे मृतदेह बेडवर आढळून आले.