अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, AIIMS नागपूर मध्ये प्राध्यापक आणि शिक्षकेतर गट A, B, C या पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवार AIIMS Nagpur च्या अधिकृत वेबसाइट, aiimsnagpur.edu.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे
कोणत्या पदांसाठी होणार भरती
1) सहयोगी प्राध्यापक 20
2) सहाय्यक प्राध्यापक 70
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) MD/ M.S किंवा समतुल्य (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) MD/ M.S किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 18 नोव्हेंबर 2023 रोजी 50 वर्षांपर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज पाठविण्याचा पत्ता (पोस्ट): The Executive Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot no.2, Sector-20, MIHAN, Nagpur-441108
निवड प्रक्रिया- बायोडेटाच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी त्यांच्या अर्जात दिलेल्या तपशिलांचा पुरावा म्हणून सर्व मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील. मुलाखत नागपुरातच होणार आहे.
अर्ज फी – सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क रुपये 2,000 आणि एससी/एसटी श्रेणीसाठी 500 रुपये आहे. PWD श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.