मुंबई । भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अचानक राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. सोशल मीडिया पोस्ट करुन त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राजकारणात मन रमत नसल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कळत नकळत काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल दिलगिरी देखील निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे. निलेश राणे यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र असलेले निलेश राणे माजी खासदार राहिले आहेत. पण सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या राजकारणात इतरांची जास्त ढवळाढवळ होत असल्यानं केल्या काही दिवसांपासून त्यांचे भाजपच्या नेत्यांसोबत खटके उडत होते. निलेश राणे यांनी राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर आता भाजपचे बडे नेते निलेश राणे यांची मनधरणी करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. मात्र निलेश राणेंनी घेतलेल्या या निर्णयामुळे समर्थकांमघ्ये नाराजी पसरली असून समर्थक निलेश राणेंची भेट घेणार आहेत.
Discussion about this post