भुसावळ । लग्नाचे आमिष दाखवून तरुणींवर अत्याचार होत असल्याचे प्रमाण वाढत असून अशातच भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तब्बल चार महिने अत्याचार केला. याप्रकरणी शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात २३ वर्षीय तरूणी वास्तव्याला आहे. सध्या ती शिक्षण घेत आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये तिची ओळख उमेर शेख मोहसीन शेख यांच्याशी झाली होती. त्याने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला.
दरम्यान अत्याचार करून आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी उमेर शेख मोहसीन शेख याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे हे करीत आहे.
Discussion about this post