चाळीसगाव | पुणे येथील खडकवासला सैन्य प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील कॅप्टन यश गोरख महाले यांचं निधन झाले आहे. प्रशिक्षण यश जखमी झाले होते. उपचार सुरु असताना त्यांचं निधन झाले. खडतर मेहनत घेऊन ही त्याला देशसेवा करण्याची संधी मिळण्याअगोदरच ही दुर्दैवी घटना घडल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
सायगाव येथील कॅप्टन यश गोरख महाले हे नुकताच भारतीय सैन्यात भरती झाला होता. भरतीनंतर पुणे येथील खडकवासला सैन्य प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असताना बॉक्सिंग खेळत असताना त्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्याच्यावर पुण्याच्या सैन्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
यश गोरख महालेवर त्याच्या मूळ गावी म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी गावात त्यांच्या पर्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. अंत्य संस्कारासाठी हजारो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सैन्यदलात भावी काळात लेफ्टनंट कर्नल पदाची स्वप्ने पाहणाऱ्या जवानाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. देशसेवा करण्याची संधी मिळण्याअगोदरच ही दुर्दैवी घटना घडल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त आहे.
जवानाच्या मृत्यूनंतर त्यांचे मामा डॉ. हेमंत शेवाये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, लहानपणापासून यशला सैन्यात दाखल होऊन देश सेवा करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने खूप खडतर परिश्रम घेतले. त्यानंतर तो सैन्य दलात दाखल झाला. मात्र प्रशिक्षण काळात त्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खंत आहे. सैन्यात शत्रूशी लढताना शहीद झाला असता तर अभिमान वाटला असता. मात्र एवढी खडतर मेहनत घेऊन ही त्याला देशसेवा करण्याची संधी मिळण्याअगोदरच ही दुर्दैवी घटना घडल्याची खंत आहे. यशला तर आम्ही गमावले आहे. परंतु अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकारने या घटनेची सखोल चौकशी करावी आणि पुन्हा अशा घटना घडणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात.
Discussion about this post