जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथील पूजा सुधाकर बारी (वय १८) या तरुणीने राहत्या घरात साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आत्महत्येमागील कारण आद्यपही अजून कळले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पूजा बारी ही घरात एकटीच होती. शनिवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास आजी नबाबाई बारी ही कामावरून घरी आली असता या वेळेस तिला पुजा ही घरातील छताच्या कडीला साडी बांधून गळफास घेतल्या अवस्थेमध्ये आढळून आली. यावेळी आजीने हंबरडा फोडला. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी धावं घेतली.
गावातील पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना कळवल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला कळवले. त्यानंतर पूजा हिला जळगाव शासकीय रुग्णालयात आणले असता या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मृत घोषित केले. तीच्या पश्चात आई, भाऊ, आजी,असा परिवार आहे. तिने आत्महत्या का केली याबाबत माहिती मिळाली नाही. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.पुढील तपास पोलीस करीत आहे.
Discussion about this post