चोपडा : लोक विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत असतात. यातील काही अनोखे आंदोलने अशी असतात ते कायम आठवणीत राहतात. आता असेच एक आंदोलन समोर आले आहे. एका तरुणाने आपल्या मागणीसाठी चक्क झाडावर चढून आंदोलन कले. निम्न तापी पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे या मागणीसाठी चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचा युवा कार्यकर्ता उर्वेश साळुंखे याने हे आंदोलन पुकारले आहे. आता त्यांच्या या आंदोलनाला पंचक्रोशीतील हजारावर नागरिकांनी निवेदनावर स्वाक्षरी करून पाठिंबा दिला.
निम्न तापी पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे या मागणीसाठी रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्री यांना पाठवून आंदोलनाचा इशारा उत्वेश साळुंखे यांनी दिला होता मात्र मुख्यमंत्री यांनी याबाबत लक्ष घालावे व सदर प्रश्नावर वेळ द्यावी याकरीता झाडावर बसून लाक्षणिक आंदोलन केले.
उर्वेश साळुंखे यांनी सकाळी ग्राम दैवताचे दर्शन घेवून आंदोलनस्थळी मार्गक्रमण केले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील शेकडो ग्रामस्थ हजर होते. र आंदोलन सुरू होताच माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आंदोलन स्थळी भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली. आंदोलक साळुंखे यास झाडावरून खाली उतरण्याची विनंती केली तसेच जि.प.चे माजी सदस्य सुनील पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.ना.अजित पवार यांनी लवकरच मंत्रालय येथे सदर प्रश्नावर भेट देण्याचे आश्वासनं दिले. डॉ.चंद्रकात बारेला, मा. चेअरमन अतुल ठाकरे, तालुकाध्यक्ष शशीकांत पाटील बबलु बोरसे संरपच रविंद्र सोनवणे ग्रामपंचायत सदस्य यशवंत सोनवणे, कैलास कोळी, समाधान बाहरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्की डॉ.रामकृष्ण पाटील यांचेसह गावातील नागरिकांनी केलेल्या विनंतीस मान देऊन दुपारी झाडावरून खाली उतरवले गेले.
Discussion about this post