मुंबई । एकीकडे आगामी निवडणूकीसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागला असून यातही पक्षांतर सुरू आहे. यादरमन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाला मुंबईमधील घाटकोपरमध्ये मोठं खिंडार पडलं आहे.घाटकोपर भागातील मनसेचे माजी विभाग अध्यक्ष रविंद्र कोठावदे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश केला आहे.
पक्षप्रवेश करताना रविंद्र कोठावदे म्हणाले आहेत की, ”माझा राग मनसेवर किंवा कोणावर नाही. मी आज उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देतोय. एक वर्षांपूर्वी माझी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. तेव्हापासून पक्ष प्रवेशबद्दल चर्चा सुरू होती आणि आज मी पक्षप्रवेश केला.
वसई-विरारमध्ये मनसेत फूट
याआधी याच वर्षात मे महिन्यात वसई-विरारमध्ये मनसेला मोठं खिंडार पडलं होतं. वसई – विरार महानगर, भोईसर विधानसभा क्षेत्रातील मनसे आणि इतर पक्षातील कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटात पक्षात प्रवेश केला होता.
Discussion about this post