जामनेर । जामनेर तालक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीला तरुणाने माझ्यासोबत निकाह कर नाहीतर तुझ्या चेहर्यावर अॅसीड फेकेल अशी धमकी देत विनयभंग केला. याप्रकरणी तरुणावर पहूर पोलिस ठाण्यात ‘पोस्को’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडितेने पहूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गावातीलच संशयित हुसेन शहा नासीर शहा याने २८ सप्टेंबर २०२३ ला दुपारी एक ते १० ऑक्टोबर २०२३ ला सकाळी साडेदहाच्या दरम्यान वेळोवेळी पहूर पेठ येथील आठवडे बाजार परिसरात माझा पाठलाग करीत शिवीगाळ करून ‘तू माझ्याशी निकाह करशील का? तू बाजारात भेटत जा, तू जर नाही भेटली तर तुझ्या तोंडावर अॅसिड टाकेन, तू जर माझी नाही झालीस तर दुसऱ्याची होऊ देणार नाही,’ अशी धमकी दिली.
या प्रकरणी पीडिता अल्पवयीन शाळकरी मुलीच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात संशयित हुसेन शहा नासीर शहा (रा. पहूर पेठ, ता. जामनेर) याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित मात्र अद्याप फरारी आहे. पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल गर्जे तपास करीत आहेत.
Discussion about this post