मुंबई : यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून 25 जून रोजी राज्यात बरसला. त्यानंतर जुलै चांगला बरसल्या नंतर ऑगस्ट महिन्यात वरुणराजाने चांगलीच दांडी मारली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात काहीसा बरा पाऊस झाला परंतु जून आणि ऑगस्ट महिन्यामधील सरासरी पावसाची तुट भरुन काढली नाही. यामुळे यंदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही.
दरम्यान आता मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु असून महाराष्ट्रात या आठवड्याच्या सुरुवातीलाच आणखी काही भागातून मान्सून परतणार आहे.
सध्या पुणे, मुंबई, कोकणासह अन्य भागातून पाऊस परतलाय. शनिवारपर्यंत निम्म्या महाराष्ट्रातून मान्सूनचे नैर्ऋत्य वारे माघार घेतील. राज्यातून मान्सून परतल्यामुळे ऑक्टोंबर हिट जाणवू लागलीय. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील कमाल तापमान वाढले आहे. दरम्यान राज्यात सध्या कुठेही पावसाची शक्यता नाही
परतीच्या प्रवासावर असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे आज देशाच्या बऱ्याच भागातून परतले आहेत. महाराष्ट्राच्या अनेक भागातून मान्सून बाहेर पडलाय. परंतु कोकण आणि विदर्भातील काही भागातून अद्याप मान्सून परतलेला नाही. मान्सूनच्या परतीसाठी पोषक वातावरण असल्यानं लवकरच संपूर्ण देशातून नैर्ऋत्य मोसमी वारे बाहेर पडतील, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलीय.
Discussion about this post