सांगली :सर्पदंशाने अवघ्या 15 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संख गावामध्ये घडली. श्रेया श्रीशैल न्हावी (वय 15) असे या शाळकरी मुलीचं नाव आहे.
याबाबत असं की, श्रेया आर. बी. पी. हायस्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती. नेहमीप्रमाणे श्रेया झोपी गेली. यावेळी गावातील वीज गेली होती. यावेळी आठच्या सुमारास तिला सर्पदंश झाल्यानंतर ती जागी होऊन ओरडू लागली. त्यानंतर कुटुंबीयांना खासगी रुग्णालयात तत्काळ नेले.
तेथून तिला रात्री दहाच्या सुमारास जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे.
Discussion about this post