जळगाव | जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी शामकांत सोनवणे यांची निवड झाली तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीत शामकांत सोनवणे यांना तब्बल १५ मते मिळून ते सभापतीपदी विराजमान झाले.
गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला ११ जागा मिळाल्या होत्या. तर भाजप-शिवसेनेच्या पॅनलला सहा तर एक अपक्ष निवडून आला होता. यामुळे मविआचा सभापती होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
आज दुपारी बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती आणि उपसभापती निवड प्रक्रियेला प्रारंभ झाला. यात सभापतीपदासाठी तर उपसभापतीपदासाठी पांडुरंग पाटील उर्फ राजू सर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, याचप्रसंगी महाविकास आघाडीतर्फे लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांनी देखील सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. विहित कालावधीत त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक झाली. याप्रसंगी लक्ष्मण टेलर यांनी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला. तर या निवडणुकीत शामकांत सोनवणे यांना तब्बल १५ मते मिळून ते सभापतीपदी विराजमान झाले. तर पांडुरंग पाटील उर्फ राजू सर हे उपसभापती बनले. या निवडीप्रसंगी माजी मंत्री तथा महाविकास आघाडीचे नेते गुलाबराव देवकर यांची देखील उपस्थिती होती.
Discussion about this post