यावल : यावल शहरात किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या घटनेत एका 61 वर्षीय इसमाने 58 वर्षीय इसमावर चाकूने हल्ला केला तर प्रतिउत्तरात 58 वर्षीय इसमाने देखील 61 वर्षीय वृद्धाला डोक्यात आणि हातावर दुखापत केली. दरम्यान, यातील चाकू हल्ल्यातील जखमींचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
यावल शहरातील बोरावल गेट भागात काल शुक्रवारी सायंकाळी प्रभाकर आनंदा धनगर (58) हे एका दुकानावर बसले होते. त्या ठिकाणी रामा ढाके (61) हे आला आणि दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यात रामा ढाके यांनी प्रभाकर धनगर यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केला तर प्रतिउत्तरात धनगर यांनी देखील एका लोखंडी रॉडने रामा ढाके यांच्या डोक्यावर वार केले आणि हातावर वार केल्याने डावा हात मोडला गेला.
दोघांना जखमी अवस्थेत तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये आणण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचाराकरिता हलवण्यात आले आहे. यावेळी उपचार सुरु असताना त्यातील प्रभाकर धनगर यांचा मृत्यू झाला आहे.
Discussion about this post