बीड : महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. ब्लॅकमेल करत एका विधवा महिलेवर सात जणांनी तब्बल सात वर्षे आळीपाळीने बलात्कार केला आहे. सततच्या त्रासाला कंटाळून आणि हतबल झालेल्या पीडितेने अखेर पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे एकचं खळबळ उडाली आहे. बलात्काराची घटना ही बीड शहरात घडल्याने हा गुन्हा बीड शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला जाणार आहे.
बीड येथील एका विधवा महिलेची पर्स संदीप पिंपळे याच्या रिक्षात प्रवासादरम्यान विसरली होती. पर्स परत देण्याच्या बहाण्याने पिंपळे याने महिलेस बीडमधील कबाड गल्लीतील रूमवर बोलावून घेतले व या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला.
ही घटना 2014 साली घडली होती. या कृत्याचा मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत रिक्षाचालकाने ब्लॅकमेल करत सतत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मित्र व नातेवाईकांना देखील व्हिडिओ देऊन बळजबरीने त्यांच्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले.
2020 मध्ये गोरख इंगोले याने जबरदस्तीने पीडितेला दुचाकीवर बसवून जरूड ते हिवरा पहाडी रोडलगत असणाऱ्या घाटात नेत त्याच्या 4 मित्रांकडून आळीपाळीने तब्बल 6 तास तिच्यावर अत्याचार केला. यामध्ये महिला गर्भवती राहिल्याने तिचा जबरदस्तीने गर्भपात देखील केल्याचं तक्रारीत म्हटलंय.
दरम्यान पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संदीप पिंपळे (रा. कबाड गल्ली, बीड), बालाजी इंगोले, गोरख इंगोले (दोघेही रा. आहेर धानोरा, ता. बीड) यांच्यासह अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post