जळगाव । हवामानात सतत चढ-उतार होताना दिसत आहे. मागील काही दिवसापासून राज्यातील बहुतांश शहरातील तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअस पर्यंत स्थिर होते. मात्र काल शुक्रवारी अचानक तापमानाचा पारा वाढला आणि ४३ अंशापेक्षा जास्त नोंद झाली. दरम्यान, आजपासून पुढील पाच दिवस जळगाव मधील तापमान ४५ अंशावर राहणार असल्याचा अंदाज आहे.
मागील गेली दोन महिने तापमानात बदल दिसून आला आहे. कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती. मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.
यामुळे तापमानाचा पारा ४० अंशखाली राहिला होता. मात्र त्यानंतर राज्यासह जळगावमध्ये तापमानाचा कहर पाहायला मिळत आहे. आजपासून २४ मे पर्यंत तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी?
सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. गरज असल्यास घराबाहेर पडताना डोक्याला रुमाल बांधावा. पाण्याची बाटली सोबत ठेवावी. दिवसभरात किमान चार ते पाच लिटर पाणी प्यावे. त्यात ओआरएसचा वापर करावा. हे ओआरएस ग्रामीण रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत. त्याचा पाण्यासोबत वापर करावा केल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही.
Discussion about this post