पुणे : एकीकडे सणासुदी सारखे दिवसांना सुरुवात झालीय तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक करणामुळे रेल्वे गाड्या रद्द केल्या जात आहे. अशातच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे.
पुणे-दौंड रेल्वे मार्गादरम्यान विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी (३ ऑक्टोबर) पाटस येथे तांत्रिक कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार असून पुढील दोन दिवस काही ट्रेन उशिराने धावणार असून अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेने याबाबतची माहिती दिली आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच ट्रेनने प्रवास करावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
कोणकोणत्या गाड्या रद्द
पाटस येथे घेण्यात येणाऱ्या विशेष ब्लॉकमुळे पुणे -सोलापूर -पुणे एक्स्प्रेस, पुणे- बारामती पैसेंजर, पुणे – दौंड पैसेंजर, बारामती – दौंड पैसेंजर, दौंड -पुणे पैसेंजर आणि दौंड- हडपसर पैसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
याशिवाय काही रेल्वेगाड्या सुटण्याची तसेच पोहचण्याची ठिकाणे देखील बदलण्यात आली आहे. यामध्ये २ ऑक्टोबर रोजी इंदूर येथून सुटणारी इंदूर-दौंड एक्स्प्रेस ही गाडी पुण्यापर्यंत धावेल. तसेच ३ ऑक्टोबरला दौंडवरून सुटणारी दौंड- इंदूर एक्स्प्रेस ही गाडी पुण्यातून सुटणार आहे.
याशिवाय हैदराबाद येथून सुटणारी हैदराबाद-हडपसर एक्स्प्रेस ही गाडी २ ऑक्टोबरला दौंडपर्यंत धावणार आहे. तसेच ३ ऑक्टोबरला हडपसरवरून सुटणारी हडपसर-हैदराबाद एक्स्प्रेस ही गाडी दौंडमधून सुटणार आहे, या ब्लॉकनंतर ट्रेन सुरळीत होईल, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
Discussion about this post