जळगाव । दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पितृपक्षाला सुरुवात होताच सोने-चांदीचे भाव कमी झाले असून सध्या सोने ५८ हजार २०० रुपये प्रति तोळा असून चांदी ७२ हजार रुपये प्रति किलोवर आहे.
गेल्या आठवड्यापासून सोन्याचे भाव कमी होत असून दोन दिवसात सोने ८०० रुपये प्रति तोळ्याने कमी झाले आहे. तसेच पाच दिवसांत चांदीचेही भाव एक हजार ५०० रुपयांनी कमी झाले आहे. तसे पाहता गेल्या महिन्याच्या तुलनेच सध्या डॉलरचे दर वाढून ते ८३.१८ रुपये झाले आहेत. मात्र तरीही भाव कमी होण्याचे कारण सट्टा बाजार सांगितला जात आहे.
सोन्याचे भाव वाढत गेल्याने दलालांनी मोठी खरेदी करून ठेवत साठा केला. त्यात आता त्यांच्याकडून त्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे हे भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. चांदीच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. त्यामुळे चांदीचेही भाव एकदम वाढत आहे तर कधी एकदम कमी होत आहे. गेल्या महिन्यातही चांदी ७१ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर पुन्हा भाववाढ होत जाऊन ती २५ सप्टेंबरपर्यंत ७३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली होती. मात्र पुन्हा घसरण होत जाऊन ती आता ७२ हजार रुपये प्रति किलोवर आली आहे.
Discussion about this post