जळगाव । जळगाव शहरासह जामनेर तालुक्यातील नागरिकांसाठी खुशखबर आहे. वाघुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्याने धरण १०० टक्के भरले आहे. सद्यस्थितीत वाघूर धरणाचे २ दरवाजे १० से.मी. ने उघडण्यात आले असून याद्वारे ६७७ कयुसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे .
नदीपात्रामध्ये कोणीही प्रवेश करू नये, शेतीसाठी उपयुक्त सामान ठेवू नये किंवा गुरेढोरे सोडू नये असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव व जिल्हा प्रशासन जळगाव यांचे मार्फत करण्यात येत आहे.
दरम्यान, वाघूर धरण शंभर टक्के भरल्याने जळगाव शहर, जामनेर व तालुक्यातील पाणी टंचाई मिटली आहे. यंदा जून व ऑगस्ट महिन्यांत पावसाने पाठ फिरवल्यामुळे वाघूर धरण ६० ते ७० टक्के भरेल अशीच शक्यता होती. यामुळे पाणीटंचाईला सामोरे जाण्याची भीती होती. मात्र, या महिन्यात जळगावसह राज्यामधील विविध भागात दमदार हजेरी लावल्यामुळे अनेक धरणांमधील देखील जलसाठ्यात वाढ झालीय.
जळगाव शहरासह जामनेर तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुर धरणही १०० टक्के भरले आहे. गेल्या वर्षापेक्षा कमी पाऊस असतानाही, वाघूर धरणाने गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकर शंभरी गाठली आहे. गेल्या वर्षी वाघूर धरण २० ऑक्टोबर रोजी १०० टक्के भरले होते
Discussion about this post