जळगाव । जिल्ह्यातील एक लाख घरांमधील रहिवाशांची अॅनमिया आणि उच्च रक्तदाबाची तपासणी केली जाणार आहे. विशेषतः महिलांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत त्यांच्यासाठी शंभर दिवसांचा आरोग्य कार्यक्रम आखण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे सांगतिले.
जळगाव शहरातील शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व महिला रुग्णालयास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधला.
जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले की, नागरिकांमध्ये असलेल्या उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, अॅनमिया याबाबत तपासणी, औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी शंभर दिवसांचा आरोग्य कार्यक्रम आखण्यासाठी समिती गठित करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय होमिओपॅथिक, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांसह जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य यंत्रणेच्या सहभागाने हा शंभर दिवसांचा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
तप्राध्यापकांना पीएचडी कार्यक्रमांसाठी नावनोंदणी करावी तसेच संशोधनावर लक्ष केंद्रित करावे. स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास केंद्र स्थापन करण्यात यावे. अशा सूचना ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
होमिओपॅथिक महाविद्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रितेश पाटील यांनी यावेळी सांगितले की, नवरात्रोत्सवात शहरातील महिलांची अॅनमिया, मधुमेह व उच्च रक्तदाबाची तपासणी केली जाणार आहे. त्याबरोबर योगा व प्राणायम शिबिरे ही घेण्यात येणार आहेत.
Discussion about this post