पाचोरा : धावत्या रेल्वेखाली यऊन एका महिलेसह पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना दुसखेडा (ता. पाचोरा) येथे घडलीय. रत्नाबाई माधव पाटील (वय ५९) व अशोक झेंडू पाटील (६०) असं दोघा मृतांची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार, परधाडे (ता. पाचोरा) येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात प्रसादासाठी दुसखेडा येथील काही ग्रामस्थ व महिला भाविक रेल्वेमार्गाजवळून जात होते. दुसखेडा गावाजवळ रेल्वेचा रूळ ओलांडताना रत्नाबाई माधव पाटील (वय ५९) व अशोक झेंडू पाटील (६०) यांना भरधाव रेल्वेची जोरदार धडक बसली.
त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गावात कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अशोक पाटील हे मूळचे पहाण (ता. पाचोरा) येथील रहिवासी असून, कुरंगी शिवारातील शेती करण्यासाठी दोन वर्षांपासून ते दुसखेडा येथे वास्तव्यास होते. घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.
Discussion about this post