मुक्ताईनगर । मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परीसरात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके वाहून गेल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनी बोदवड , मोरझिरा , धामणगाव येथे शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या सोबत नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत चर्चा केली.
बोदवड येथे बोदवड ते पूर्णा नदी या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावरिल नाल्याचे पाणी नाल्याचा प्रवाह सोडून बाजुच्या शेतात शिरल्याने शेतजमिन खरडून गेली असुन शेतातील पिके वाहुन गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच मोरझिरा येथे असलेला तलाव तुडुंब भरला असून तलावाच्या सांडव्यातून आणि भिंती वरुन पाण्याचा विसर्ग होत आहे पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. धामणगाव येथे सुध्दा नाल्याच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
ॲड. रोहिणी खडसे यांनी बोदवड , मोरझिरा , धामणगाव येथे शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या सोबत नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत चर्चा केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बोदवड येथील नाल्यावर उंच मोरी (पुल) बांधण्याची तसेच मोरझिरा तलावाच्या भिंतीची ऊंची वाढविण्याची मागणी केली तसेच धामणगाव – मधापुरी – चारठाणा रस्त्यावर असलेल्या पुल पुराच्या पाण्याने क्षतिग्रस्त झाला असल्याने वाहतूक बंद झाली आहे. क्षतिग्रस्त पुलाची दुरुस्ती करण्या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
यावेळी ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या रात्रीच्या मुसळधार पावसामुळे या परीसरात शेती पिकांचे नुकसान झाले असुन मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या सोबत नुकसानीचे पंचनामे करण्या बाबत चर्चा केली आहेनाल्यांवर असलेल्या लहान मोऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलून पुराचे पाणी शेतात शिरून पिके खरडून गेली आहेत त्याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यां सोबत शक्य तिथे उंच पुलांच्या निर्मितीचे प्रस्ताव सादर करण्या बाबत चर्चा केली आहे आ. एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे ॲड. रोहिणी खडसे यांनी सांगीतले
Discussion about this post