जळगाव । आमदार चंद्रकांत पाटील यांनी कर्की येथे स्टींग ऑपरेशन करून पिक विम्यातील दलाली उघडकीस आणली होती. त्यांनी याची तक्रार शासनस्तरावर प्रधान सचिव कृषी विभाग यांच्याकडे केल्यामुळे पीक विम्याची रक्कम रखडली. यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे !” असा आरोप एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषदेत केला.
खडसे म्हणाले, जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या संदर्भात असंतोष असून, एक ते ३१ ऑगस्ट दरम्यान शेतकऱ्यांना विम्याची रक्कम खात्यावर मिळणे आवश्यक असताना एक महिन्याच्या वर वेळ निघून गेली तरी अद्यापही पैसे मिळालेले नाही.
दरम्यान, नियमानुसार विमा कंपनीने रक्कम दिली नाही तर बारा टक्के व्याज त्यावर लावून दिले जाते. त्यामुळे १२ टक्के व्याजासह पैसे कधी मिळणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील ७६ हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांना विमा देण्याची घोषणा केली.
मंत्री गिरीश महाजन यांनी ७६ हजार हेक्टर शेतजमिनीवरील शेतकऱ्यांना १२ टक्के व्याजासह विमा रक्कम देण्याची घोषणा केलेली आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना विमा का मिळाला नाही? असा प्रतिप्रश्न खडसे यांनी याप्रसंगी केला. सीएमव्ही या रोगाच्या संदर्भात तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वर्षांपूर्वी मुक्ताईनगर येथे झालेल्या जाहीर सभेच्या दरम्यान घोषित केले होते.
मात्र अद्यापही शेतकऱ्यांना सीएमई रोगाचे कोणत्याही प्रकारचे नुकसानी नुकसानीचे पंचनामे होऊन देखील अद्यापही कोणताही लाभ केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचा टोला खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना लावला. पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना लवकर न मिळाल्यास राष्ट्रवादीने जाहीर केल्याप्रमाणे आंदोलन करण्याचा इशारा देखील खडसे यांनी याप्रसंगी दिला.
Discussion about this post