जळगाव : जर तुम्हीही विविध कारणासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण दोन कोटी रुपयांचे कर्ज मंजुरीची थाप मारत प्रोसेसिंग फीच्या नावाखाली राकापार्क भागातील दोघांची साडेसहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
शहरातील राका पार्कमध्ये पराग प्रभाकर भावसार हा तरुण वास्तव्यास आहे. पराग हा जून 2021 त्याचा मामेभाऊ भूषण अविनाश भावसार (तिडके नगर, नाशिक) यांच्याकडे दाक्षायणी फायनान्सशियल सर्व्हिसेस कंपनीत शाखाधिकारी म्हणून नोकरीला होता. सोशल मीडियावर कंपनीचा प्रचार करीत असतांना ओमप्रकाश पाटील आणि राहहुल हिलाल देवरे हे दोघे परागच्या संपर्कात आले. भूषण भावसार याने त्यांना सीएसआर फंडबद्दल माहिती देवून कर्ज मंजूर होणार असल्याचे सांगितले.
परंतु त्यापुर्वी प्रोसेसिंग फी म्हणून दोघांकडून साडेसहा लाख रूपये भरण्यास भूषण भावसार याने सांगितले. त्यानुसार ओमप्रकाश पाटील आणि राहूल देवरे यांनी आरटीजीएसच्या माध्यमातून रक्कम ट्रान्सपर केली. त्याचा पुरावा म्हणून शाखाधिकारी पराग भावसार यांच्या नावाने नोटरीदेखील केली.
अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील संबंधित कर्जाबाबत पराग भावसार व दोन्ही ग्राहकांनी भुषण भावसार यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. परंतु सुरुवातीला त्यांना काम सुरू असल्याचे सांगत वेळ मारुन नेली मात्र काही दिवसानंतर त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ओमप्रकाश पाटील व राहुल देवरे यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली.
गुरूवारी पराग भावसार यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Discussion about this post