भुसावळ | भुसावळ पोलिसांनी तब्बल ५३ क्विंटल इतका बनावट खवा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. जप्त केलेला बनावट खवा हा सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांचेकडे पुढील योग्य त्या कारवाईसाठी सदर मुद्देमाल वर्ग करण्यात आला आहे. आगामी सणासुदीच्या आधी इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट खवा जप्त करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, भुसावळ यांना सुमारे ४/५ दिवसापूर्वी बातमी मिळाली की, भुसावळ शहरात लक्झरी मधून अहमदाबाद (गुजराथ) येथून बनावट खवा (मावा) हा बेकायदेशीररित्या आणून येथून दुसरीकडे डेअरी चालक व हॉटेल चालकांना विक्री करणार असले बाबत माहिती मिळाली. या अनुषंगाने, डीवायएसपी कष्णात पिंगळे यांनी कार्यालयाचे पोहेकॉ सुरज पाटील यांना त्यांनी सदर बातमी बाबत सुचना दिल्या. त्यानुसार पोहेकॉ. सुरज पाटील यांनी इत्यंभूत माहिती गोळा करुन उप विभागीय पोलीस अधिकारी पिंगळे यांना दिली.
त्यानुसार दि.२२ रोजी सदर बनावट मावा आणून पुढील विक्रीसाठी गाडी मध्ये लोड करीत असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ उपविभाग यांचे कडिल पथकाचे अंमलदार पोहेकॉ. सुरज पाटील, पोहेकॉ. संदिप चव्हाण, चासफौ. अनिल चौधरी, पोना. संकेत झांबेर अशांना रवाना केले.
या पथकाने सदर लक्झरी बस ही अहमदाबाद येथून युरिया सदृश्य बनावट खवा च्या एकूण १७८ बॅग ह्या वेगवेगळया डेअरीवर पोहचविणेकामी देण्यात आले होते. या कार्यवाहीत एकूण ४२ खोके व १३६ बॅग अश्या एकूण १७८ प्रत्येकी ३० किलो प्रमाणे एकूण ५३४० किलो अशी एकूण ११,७४,८००/- रुपये किमतीचा माल आणणारे एम. के. बस सहस लक्झरी बस क्र. जीजे ०१-ईटी-१२१० वरील चालक कन्नु पटेल, वय-३७, रा. अमदाबाद व आयशर गाडी क्र. जीजे ३८-टिए- १८०० या गाडीवरील चालक सैय्यद साबीर सैय्यद शब्बीर, वय ३५, रा.अहमदाबाद (गुजराथ) यांचेसह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
जप्त केलेला बनावट खवा हा सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांचेकडे पुढील योग्य त्या कारवाईसाठी सदर मुद्देमाल वर्ग करण्यात आला आहे.
Discussion about this post