मुंबई । सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी खुशखबर आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX Gold Price) वर सोने स्वस्त झाले आहे. आज सोन्याच्या दरात 350 रुपयांहून अधिकची घसरण पाहायला मिळत आहे. याशिवाय चांदी 880 रुपयांनी स्वस्त झाली आहे. MCX वर सोन्याची किंमत 59,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज 10 ग्रॅमची किंमत काय आहे ते पाहूया-
एमसीएक्सवर सोने स्वस्त झाले
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याचा भाव 0.57 टक्क्यांनी घसरून 59065 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर आहे. याशिवाय चांदीचा भाव 1.12 टक्क्यांनी घसरून 72409 रुपये प्रति किलोच्या पातळीवर आला आहे.
सोन्याची किंमत किती आहे?
22 कॅरेट सोने 55350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,370 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. सध्या एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये आहे.
Discussion about this post