नवी दिल्ली । संसदेच्या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सरकारने संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत महिला आरक्षण विधेयक सादर केले. हे विधेयक राज्य विधानसभा आणि दिल्ली विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याशी संबंधित आहे. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. दरम्यान, या विधेयकावर चर्चा सुरु झाली असून विरोधी पक्षाकडून काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधींनी चर्चेला सुरुवात केली.
काय म्हणाल्या सोनिया गांधी?
महिला आरक्षण विधेयकावर सोनिया गांधी म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष या विधेयकाला पाठिंबा देतो. विधेयक मंजूर झाल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत पण काळजीतही आहोत. मला एक प्रश्न विचारायचा आहे की भारतीय महिला गेल्या 13 वर्षांपासून त्यांच्या राजकीय जबाबदारीची वाट पाहत आहेत. आता त्यांना आणखी काही वर्षे वाट पाहण्यास सांगितले जात आहे. किती वर्ष? भारतीय महिलांना ही वागणूक योग्य आहे का? हे विधेयक तातडीने लागू करावे, अशी काँग्रेसची मागणी आहे.
Discussion about this post