वाशिम : समृद्धी महामार्गावर होणारे अपघाताचे सत्र थांबताना दिसत नाहीय. अशातच आणखी एक भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर कारच्या समोर अचानक जंगली प्राणी आल्याने त्याला वाचवण्याच्या नादात कारणे तीन पलट्या मारल्या. या घटनेत कार मधील एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक असे की, पुण्यावरून अमरावतीकडे जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील लोकेशन १९६ जवळ अपघात झाला. जंगली प्राणी वाचवण्याच्या नादात कारणे तीन पलट्या मारल्या.
यामधील एका महिलेचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. सुनंदा अनुज दुरतकर असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अनुज दुरतकर (वय 65), पंकज अनुज दुरतकर (वय 35) भावना पंकज दुरतकर (वय 30) असे या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळतात कार्ड लोकेशन समृद्धी महामार्ग पायलट विधाता चव्हाण,डॉ. सोहेल खान घटनास्थळी दाखल झाले. तसेच डॉ. अडोळेंनी घटनास्थळी दाखल होत जखमीना घेऊन कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे दाखल केले. यातील गंभीर जखमींना श्रीगुरु मंदिर सेवक रमेश देशमुख हे पुढील उपचारासाठी अमरावती येथे घेऊन गेले आहेत.
Discussion about this post