शाळेतून घरी जाणाऱ्या एका मुलीची ओढणी काही टारगट मुलांनी ओढल्याने ती सायकलवरुन खाली पडली. तितक्यात समोरुन वेगाने आलेल्या मोटारसायकलीने या मुलीला उडविल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यात घडला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी शाळेतून सायकलवरून घरी निघाली होती. रस्त्यात दोन खोडकर भावांच्या मस्तीमुळे हा अपघात झाला. रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचानक विद्यार्थिनीच्या गळ्यातील ओढणी हिसकावला. (Viral VIdeo)
यूपी के अम्बेडकरनगर में शर्मनाक वारदात।
स्कूल से वापस लौट रही छात्रा का दुपट्टा खींचा
साइकिल से घर जा रही युवती सड़क पर गिरी
दुपट्टा खिंचने से सड़क पर गिरी छात्रा।
पीछे से आई बाइक ने छात्रा के सिर पर चढ़ी, मौत#UP #ambedkarnagarpolice pic.twitter.com/sa7yKag8XB— Shivam Yadav (@Shivam28Y1) September 16, 2023
अचानक ओढणी ओढल्याने विद्यार्थिनीचा तोल गेला आणि ती रस्त्यावर कोसळली. विद्यार्थिनी रस्त्याच्या मधोमध पडल्याने मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत तिचा मृत्यू झाला.
शुक्रवारी झालेल्या अपघाताला सामान्य अपघाताची घटना सांगून पोलिसांनी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. मात्र शनिवारी या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर सगळा प्रकार समोर आला.
Discussion about this post