तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात असाल, तर IDBI बँक तुमच्यासाठी एक नोकरीची चांगली संधी घेऊन आली आहे. IDBI बँकने ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. पात्र उमेदवार या पदासाठी ऑनलाइन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२३
या भरती अंतर्गत ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदाच्या ६०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
पदाचे नाव – ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर.
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
एकूण रिक्त पदे – ६००
वयश्रेणी :
खुला प्रवर्ग – २० ते २५ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
फी किती असेल
आयडीबीआय बँकेच्या या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST आणि PWD प्रवर्गांसाठी 200 रुपये शुल्क आहे.
Discussion about this post