जळगाव । जळगाव तालुक्यतील धोबी वराड येथील शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत प्रतिकार करून मान पकडण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला शेतकऱ्याने उचलून पटकले. यावेळी आरडाओरड झाल्याने आजूबाजूचे शेतकरी व मजूर मदतीला धावून आल्याने बिबट्याला पळ काढावा लागला. मात्र थरार घटनेत शेतकरी जखमी झाला असून त्यांना तत्काळ जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
धोबी वराड येथील आशिष सुधाकर सुरळकर हे सकाळी नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी जात असताना, अचानक बिबट्याने हल्ला केला. आशिष यांनी वेळीच प्रसंगावधान राखत प्रतिकार करून मान पकडण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला उचलून पटकले. या प्रयत्नात मात्र त्यांच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला बिबट्याने पंज्याने वार केला.
त्यात त्यांच्या डोळ्याला, कानाला, जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. आजूबाजूचे शेतकरी व मजूर मदतीला धावून आल्याने बिबट्याला पळ काढावा लागला. जखमी आशिष यांना तत्काळ जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले.
दरम्यान, धोबी वराड गावात बिबट्याची प्रचंड दहशत असून, बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी या वेळी केली.
Discussion about this post