नाशिक । नाशिकमध्ये हादरवून सोडणारी एक घटना समोर आलीय. पतीने पत्नीची झोपेतच निर्घृणपणे हत्या करत स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केलीय. विशाल निवृत्ती घोरपडे आणि प्रीती विशाल घोरपडे अशी मृत पती-पत्नीची नावे असून विशालने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही.
ही घटना आडगाव परिसरातील इच्छानगरमध्ये घडली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विशाल घोरपडे पत्नी प्रीती घोरपडे हिच्यासह नाशिक शहरातील (Nashik News) आडगाव परिसरातल्या इच्छामनीनगर येथे राहत होता. मंगळवारी रात्री काही कारणावरुन त्यांचा वाद झाला होता. दरम्यान, प्रीती गाढ झोपेत असताना विशालने बुधवारी पहाटेच्या सुमारास तिची हत्या केली.
प्रीती झोपेत असताना विशालने घरातील मुसळीने तिच्या डोक्यात सपासप वार केले. या घटनेत प्रीतीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या हत्येनंतर विशालने घरातच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, या शेजारच्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे.
Discussion about this post