दतिया : मध्य प्रदेशातील दतिया येथे शेळ्या चरण्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर संपूर्ण गावावर शोककळा पसरले आहे. दोन्ही गटामध्ये झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसांपूर्वी दोन्ही गटांमध्ये वाद झाला, त्यानंतर मंगळवारी दोन्ही गट आमनेसामने आले आणि हा रक्तरंजित खेळ सर्वांसमोर झाला. या रक्तरंजित संघर्षात सुमारे 6 ते 7 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत असे की, शेळी फार्मवर शेळ्या चरण्यावरून दोन्ही गटामध्ये वाद सुरू झाला होता. शेतावर प्रकाश डांगी व प्रीतम पाल यांच्यात अंदाधुंद गोळीबार झाला त्यात प्रकाश डांगी, रामनरेश डांगी, सुरेंद्र डांगी, राजेंद्र पाल व राघवेंद्र पाल यांचा गोळी लागून मृत्यू झाला. याआधीही दोन्ही गटामध्ये तीन वेळा वाद झाला होता, त्यानंतर दोन्ही पक्षांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
अर्धा डझन लोक जखमी
दोन्ही गटांमध्ये झालेल्या वादात सुमारे 6 ते 7 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. एसपींनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. गोळीबारानंतर रस्त्यावर अनेक ठिकाणी रक्ताचे डाग स्पष्टपणे दिसत आहेत. सध्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी एफएसएल टीम पाठवण्यात आली आहे.
Discussion about this post