Friday, April 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दूध भेसळीविरोधात जळगाव जिल्ह्यात धडक मोहीम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 12, 2023
in जळगाव जिल्हा
0
दूध भेसळीविरोधात जळगाव जिल्ह्यात धडक मोहीम
बातमी शेअर करा..!

जळगांव : जिल्ह्यातील दूधात व दूग्धजन्य पदार्थामध्ये होणाऱ्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यमातून 1 सप्टेंबर पासून दूध भेसळी विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे.

15 सप्टेंबर पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात विविध डेअरी आस्थापनांवर दूध भेसळ व वजनमापनाचे खटले दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली आहे.

अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन या समितीत अपर पोलीस अधिक्षक, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व वैध मापनशास्त्र उपनियंत्रक हे सदस्य तर जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी सदस्य सचिव आहेत.

दूध संस्था, संकलन केंद्र, प्रोसेसिंग प्रकल्प, दूध व दूग्धजन्य पदार्थ पुरवठा करणारे, निर्मिती करणारे, विक्री करणारे, स्विट मार्ट, इतर सबंधित उद्योजक यांच्या तपासण्या धडक मोहिमेत करण्यात येणार आहे. धडक मोहिमेद्वारे कुणालाही त्रास देणे हा उद्देश नसून दूध उत्पादक व दूध, दूग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांनी शुध्द दर्जाचे दूध व दूग्धजन्य पदार्थ ग्राहकांना द्यावेत. हा यामागील उद्देश आहे.

या समितीमार्फत 1 सप्टेंबर रोजी चाळीसगांव येथे 8 डेअरीच्या तपासणीअंती भेसळयुक्त दुध नष्ट केलेले असून 4 डेअरी आस्थापनांवर वजनमापे विभागाने खटले दाखल केलेले आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून एक सॅम्पल तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आलेले आहे. जनावरांच्या गोठ्यात अनधिकृत ऑक्सीटोसीनचा वापर आढळल्याने पशुसंवर्धन खात्यामार्फत नाशिराबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 5 सप्टेंबर रोजीच्या धडक तपासणी मोहिमेत एरंडोल येथे 3 वजनमाप खटले दाखल करण्यात आलेले असून 22 लि. भेसळयुक्त दुध नष्ट करून, 2 सॅम्पल्स अन्न व औषध प्रशासनाकडून लॅब तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.

दूध व दूग्धजन्य पदार्थांचे उत्पादक, दूध संकलक, विक्रेते यांनी संकलन व विक्री करीत असलेले दूध व दूग्धजन्य पदार्थ हे उच्च गुणप्रतीचे व भेसळविरहित असले पाहिजे व सदर पदार्थाच्या वापराच्या मुदतीचा दिनांक अशा दूध व दूग्धजन्य पदार्थाच्या पॅकेट्सवर/ डब्यांवर स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे. मुदतबाह्य दूध व दूग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवू नये. समितीमार्फत करण्यात येणाऱ्या तपासण्यांमध्ये दोषी आढळून आल्यास संबंधितांवर लगेचच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 व नियमन 2011 अंतर्गत दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दुध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ आढळल्यास जनतेने समितीस तक्रार दाखल करण्याचे आवाहन ही समितीमार्फत करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगावात : असे आहेत दौऱ्याचे नियोजन

Next Post

आज जळगाव येथून पाचोरा मार्गे चाळीसगावकडे जाणारे अवजड वाहनाच्या मार्गात बदल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post

आज जळगाव येथून पाचोरा मार्गे चाळीसगावकडे जाणारे अवजड वाहनाच्या मार्गात बदल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना : अनाथ व निराधार बालकांसाठी मायेचा आधार

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना : अनाथ व निराधार बालकांसाठी मायेचा आधार

April 10, 2026
रेशन कार्ड वाल्यांसाठी ३० जून तारीख खूप महत्त्वाची ; हे काम आजच पूर्ण करा..

रेशन कार्डधारकांनो सावधान! ३० एप्रिलपर्यंत ‘हे’ काम पूर्ण करा, अन्यथा धान्याचा पुरवठा कायमचा होणार बंद

April 10, 2026
कोणत्याही परीक्षेशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी ; लगेच अर्ज करा

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात काम करण्याची सुवर्णसंधी ! दरमहा ₹२०,००० स्टायपेंड मिळणार ; अर्ज कुठे अन् कसा करावा?

April 10, 2026
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तारखेला पुन्हा येणार जळगाव दौऱ्यावर

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ‘भूकंप’ होणार? शिंदेंच्या मंत्र्यांच्या ‘ऑपरेशन टायगर’चा मोठा दावा!

April 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page